आईबद्दल अपशब्द सहन न झाल्याने मुलाची आत्महत्या 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहाटणी येथे आईबाबत मित्रानी वापरलेले अपशब्द सहन न झाल्याने एका तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दोन मित्रांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वैभव गजानन काळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याच्या आईने फिर्याद दिली आहे. तर संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे (रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मित्रांची नावे आहे. संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे हे दोघे जण वैभव काळे यांचे मित्र आहेत.

दोघानी वैभवच्या आईबाबत अपशब्द वापरले. हे सहन न झाल्याने वैभवने १० डिसेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास वाकड पोलिस करीत आहेत.