मध्यप्रदेशातून मोबाईल चोरट्यास केली अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

हिंजवडी, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल शॉपी फोडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस यासाठी मध्यप्रदेशातील मुरेना येथे गेले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8842cab5-c88e-11e8-b61d-e30a55d18257′]

गिराज कुसवाह याला अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने आणि त्यांचे पथक दिल्लीला गेले होते. दरम्यान मोबाईल दुकान फोडणारा चोरट्याची माहिती विक्रम कुदळ यांना मिळाली. त्यामुळे हे पथक मध्यप्रदेश येथील मुरेना जिल्ह्यात गेले. माहिती काढली असता कुसवाह हा पुण्याला आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यामुळे पुणे स्टेशन येथे सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी करून चोरीचे दिड लाख रुपये किंमतीचे १५ मोबाईल जप्त केले.

वाल्याचा वाल्मिकी झालेल्या अट्टल चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण, तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने, कर्मचारी अशोक दुधावणे, धनराज किरनाळे, दादा पवार, रमेश गायकवाड, बिभीषण कण्हेरकर, सुरेश भोसले, बापूसाहेब धुमाळ, विजय गंभिरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम आणि त्यांच्या पथकाने केली.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B07DJHV6S7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ad46a7b1-c88e-11e8-ab31-a9ed0ee5b8f7′]