देशाचा विकास केल्याने नरेंद्र मोदी यांना मिळाला हा महत्वाचा पुरस्कार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला उत्कृष्ट नेतृत्व दिल्या बद्दल फिलिप कोटलर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आहे. अमेरिकेच्या इमोरी यूनीवर्सिटीचे प्रोफेसर डॉ. जगदीश सेठ यांनी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट नेतृत्वा बद्दल दिला जातो. हा पुरस्कार मिळणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

नरेंद्र मोदी यांना या पुरस्कारात देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रात म्हणले आहे कि, नरेंद्र मोदींनी देशाला निःस्वार्थी भावनेतून नेतृत्व प्रदान केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच भारताचा आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्राचा उत्कृष्ट  विकास झाला आहे असे या प्रशस्तिपत्रात म्हणले आहे.  मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियावर निर्माण करण्यात आलेल्या योजनामुळे देशातील नव्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले आहे. तसेच भारताची ओळख हि औद्यागिक लेखा आणि वित्त सेवांचे  केंद्र म्हणून पुढे आली आहे असे या प्रशस्तिपत्रात म्हणले आहे.

फिलिप कोटलर हे प्रसिद्ध मार्केटिंग गुरु आहेत. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटीच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंगचे प्रोफेसर म्हणून कार्यरत असणारे फिलिप कोटलर हे स्वतः मोदींना पुरस्कार देण्यासाठी भारतात येणार होते मात्र त्यांच्या प्रकृतीत बिगड असल्याने ते येऊ शकले नाहीत.  म्हणून त्यांनी डॉ. जगदीश सेठ यांना पुरस्कार वितरित करण्यासाठी पाठवले होते.