त्याने दिली दारूच्या नशेत मोदींना जिवे मारण्याची धमकी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणाची धावपळ उडाली हेती. एका व्यक्तीने मुख्तार अली असे नाव सांगत दिल्ली पोलीस कंट्रोल रूमला कॉल केला आणि पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देत त्यांच्या विषयी अपशब्दही वापरले. यानंतर पोलिसांनी आनंद पर्वत भागातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली. मात्र, त्याने दारूच्या नशेत पोलीस कंट्रोल रूमला कॉल केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकारानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेदृष्टीने दिल्ली पोलिसांनी आयबी, एसपीजी तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना याविषयीची माहिती दिली. याबाबत माहिती अशी की, एका व्यक्तीने पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून पंतप्रधान नरेंद्र मोंदीबद्दल अपशब्द वापरत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच इतर भाजपच्या नेत्यांविषयीही अपशब्द वापरले. या कॉलची गंभीर दखल घेत सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला असता तो कॉल आनंद पर्वत भागातून आला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी रात्री उशिरा शिंपी काम करणाऱ्या मुख्तार अली यास मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतले.

आयबी, एसपीजी, स्पेशल सेल, क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत आरोपीची चौकशी सुरू होती. मुख्तार अलीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आसून पोलीस याप्ररणाचा अधिक तपास करत आहेत.