राजकीय

तुम्हाला तुमचे पैसे चोरून स्वतःच्या घरात वाटणारा प्रधानसेवक हवा आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला कसला प्रधानसेवक पाहिजे आहे. तुमचे पैसे चोरून स्वतःच्या घरात वाटणारा सेवक हवा आहे का ? असे प्रश्न विचारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधकांना केंद्रात कुचकामी सरकार हवे आहे. त्यांना फक्त स्वतःचे दुकान चालण्याशी मतलब आहे असे म्हणून त्यांना दुबळे सरकार निर्माण करायचे आहे असे म्हणत मोदींनी विरोधी पक्षांच्या एकीला लक्ष केले आहे. नवी दिल्ली येथे भाजपच्या सदस्यांची राष्ट्रीय परिषद भरली आहे त्या परिषदेला संबोधित करताना नरेंद्र मोदी बोलत होते. या परिषदेला भाजपचे देश भरातील आमदार आणि खासदार उपस्थित राहिले आहेत.

मी अत्यंत कठीण परिस्थितीत इथपर्यंत पोहचलो आहे. मी पक्षाला नेहमी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माझ्यावर माझ्या पक्षाचे संस्कार नसते तर दुसऱ्याच्या गोड बोलण्याला मी नेहमीच फसलो असतो. अपक्षांच्या परंपरेमुळे शिस्तीमुळे आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनती मुळे मी इथपर्यंत येऊन पोहचलो आहे असे मोदींनी म्हणले आहे. तुम्हाला कसला प्रधानसेवक पाहिजे आहे. तुमचे पैसे चोरून स्वतःच्या घरात वाटणारा सेवक हवा आहे का ? तुमच्या घरातील गोष्टी शेजाऱ्याच्या घरात जाऊन सांगणारा पंतप्रधान हवा आहे का असे नरेंद्र मोदी यांनी म्हणले आहे.

जे पक्ष काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधातील विचारधारा सांगत होते ते पक्ष आता काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले आहेत. तेलंगणात काँग्रेसला नाकारले आहे. तर कर्नाटकात त्यांनी छळवादाने सरकार स्थापन केले आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्री म्हणतात कि,  मी मुख्यमंत्री झालो नसून मी कारकून झालो आहे. विरोधकांचे कटकारस्थान हा फक्त ट्रेलर आहे चित्रपट अजून बाकी आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या