पुणे विभागीय आयुक्तपदी डॉ. दीपक म्हैसेकर

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे आता पुण्याचे नव विभागीय आयुक्त असतील. त्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

भुजल सर्वेक्षण संचालक शेखर गायकवाड यांची पदोन्नतीवर नवे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यांच्याकडे भुजल सर्वेक्षणचा अतिरिक्त कार्यभार असेल.

ADV

ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी हे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचे (जेएनपीटी) अध्यक्ष म्हणून लवकरच रुजू होणार आहेत. केंद्र सरकारने नुकतीच त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. राज्य सरकारनेही त्याबाबतचा आदेश काढला आहे. यापूर्वी ते मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते. अनिल डिग्गीकर यांची जेएनपीटी अध्यक्ष पदावरुन बदली झाल्यानंतर उपाध्यक्ष नीरज बन्सल यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नागपूरचे नवे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पर्यावरण संचालक पी. एन. पाटील यांची बदली जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी करण्यात आली आहे.

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरुन ३१ डिसेंबरला निवृत्त झालेले सुनिल पोरवाल यांची राज्य माहिती आयुक्तपदी (कोकण खंडपीठ) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी शपथ घेतली.