बीआरटी मार्गात पीएमपीएमएल पडली बंद

पिंपरी : पाेलीसनामा ऑनलाईन

दोन दिवसांपूर्वी दापोडी ते निगडी या चौदा किलोमीटर बीआरटी मार्गाचे उदघाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले होते. खरं तर बीआरटी मार्गात बस बंद पडने हे पिंपरी-चिंचवड करांसाठी नित्याचाच आहे, आज असाच काही प्रकार पाहायला मिळाला. यामुळे पाच ते सहा बस अडकल्या होत्या.
[amazon_link asins=’B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6ee2e24-aa02-11e8-89ad-614dba80027a’]
कोणी नगरसेवक शोधून देतयं का नगरसेवक 

दापोडी ते निगडी हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता तो दोन दिवसांपूर्वी न्यायलायच्या मंजुरी नंतर उदघाटन करून खुला करण्यात आला, परंतु आज बीआरटी मार्गात पीएमपीएमएल बस बंद पडल्याने प्रवाश्यांचा खोळंबा झाला. त्यामुळे पाच ते सहा बस बीआरटी मध्ये थांबून होत्या, याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला आहे. सायंकाळी चारच्या सुमारास बस मोरवाडी चौकातील बीआरटी मध्ये अडकली होती. त्याचबरोबर अनेक दुचाकीस्वार देखील अडकले होते. अशा घटनांमुळे बीआरटी मार्गातील अडथळे सुरू होते ते अद्यापही सुटले नाही त्यामुळे या घटने ने सिद्ध होते.

पेट्रोल – डिझेलच्या दरात विक्रमी वाढ