पुणे : गॅस वितरण टेम्पो चालकाची नजर चुकवून सिलेंडर चोरणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

सोसायटीच्या बाहेर पार्क केलेल्या गॅस वितरण टेम्पो चालकाची नजर चुकवून सिंलेंडर चोरणाऱ्या दोघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नवभारत शाळा ते स्मशान भुमी शिवणे नांदेड सिटी रोडवर गुरुवारी (दि.१३) रात्री सातच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी पाच गुन्हे उघडकीस आणून २७ गॅस सिलेंडर, गुन्ह्यात वापरलेली ज्युपीटर गाडी असा एकूण ७७ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf6c5ae4-bb2c-11e8-b84a-6992d4547df4′]

संजय चंद्रकांत गिरजे (वय-४५ रा. मोहननगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या सोबत असणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.

भाजपाची नवी मोहीम: नमो अॅप’ वरुन टी-शर्ट, टोप्या, पेनची विक्री 

नवभारत शाळा ते स्मशान भुमी शिवणे नांदेड सिटी रोडवर गस्त घालत असताना दोघेजण ज्युपीटर गाडीवर सिलेंडर घेऊन जाताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पूर्वी झालेल्या सिलेंडर चोरीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. गॅस सिलेंडर देण्यासाठी आलेला मुलगा गॅस देण्यासाठी सोसायटीत किंवा बिल्डींगमध्ये गेल्यानंतर त्याची नजर चुकवुन गाडीतील सिलेंडर चोरुन नेत असल्याची माहिती आरोपींनी दिली. आरोपींनी पुणे शहरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे सिलेंडर चोरले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याच्या ‘पर्स’वर चोट्यांचा डल्ला 

भारत पेट्रोलीयम, हिदूस्थान पेट्रोलियम व इंडेन गॅस सिलेंडर चोरल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. आरोपींकडून उत्तमनगर, कोथरुड, येरवडा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १, वारजे पोलीस ठाण्यातील २ असे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1603794-bb2c-11e8-b4c7-9593ee81794b’]

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगांवकर, परिमंडळ -३चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतिश डहाळे, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक के.के. कांबळे, सहायक पोलीस फौजदार सुर्यवंशी, पोलीस नाईक मिसाळ, तनपुरे, पाटील, राऊत, ढमढेरे, ताकवणे, त्रिंबके यांच्या पथकाने केली.