CRPF च्या जवानाला मारहाण केल्याबद्दल ग्रामीण पोलिसांनी ‘हा’ दावा केला

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफ जवानाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. मात्र, सीआरपीएफ जवानाला मारहाण करण्यात आली नसल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. अशोक इंगवले असे मारहाण झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव आहे.

सोनगाव येथील सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे आज सकाळी बारामती तालुका पोलीस ठाण्यात श्रद्धांजली सभा आणि शिवजयंती कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी दुचाकीवरुन ट्रिपल सिट आल्याने त्यांना हटलकले. पोलिसांनी दुचाकीवरुन ट्रिपल सिट आल्याचा व दारु पिल्याचा आरोप करीत मारहाण केल्याचे इंगवले यांचे म्हणणे आहे.

तर, अशोक इंगवले हे ट्रिपल सिट आल्याने ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले. त्यावेळी इंगवले आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याला ठाणे अंमलदार कक्षात चौकशीसाठी नेले असता, इंगवले याला राग आल्याने त्याने कक्षातील खुर्चीचे नुकसान केले. मात्र, पोलिसांनी त्यांना मारहाण केली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक हे करीत आहेत.