पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नावापुरतच?

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन 
कृष्णा पांचाळ

पिंपरी-चिंचवडच्या २० लाख जनतेची पोलीस आयुक्तलयाची आता प्रतीक्षा संपणार आहे.अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज उद्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ध्वजारोहण करून सुरू केलं जाणार आहे. महानगर पालिकेच्या ऑटोक्लस्टर इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात कामकाजाचा शुभारंभ होईल. मात्र प्रत्यक्षात तिथं केवळ आयुक्तालय नावाचे फलक आणि ध्वजारोहनाचं साहित्य पोहचल आहे. त्यामुळं आयुक्तालय सुरू करण्याची घाई नेमकी कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जातोय.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच खऱ्या अर्थाने प्रेमलोक पार्क येथील शाळेच्या इमारतीत कामकाज सुरू होणार आहे. मात्र याठिकाणच्या सुशोभीकरणाचे काम १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण होण्याची चिन्ह नाहीत. म्हणून आयुक्तलयाच तात्पुरत्या स्वरूपात कामकाज हे महानगर पालिकेच्या ऑटोक्लस्टर येथून सुरू करण्याची घोषणा झाली. अवघ्या काही तासात ही घोषणा पूर्ण होणार अशी आस शहरवासीय लावून आहेत. मात्र प्रत्यक्षात ऑटोक्लस्टर मध्ये केवळ आयुक्तलयाच नाम फलक आणि ध्वजारोहनच साहित्य पोहचलेले आहे.या व्यतिरिक्त कामकाज सुरू करण्यासाठी ना कोणतं साहित्य पोहचलय ना सोयीसुविधा. त्यामुळे आयुक्तलय सुरू करण्याची घाई कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’34dd7ddd-9fc3-11e8-a938-893f49fda1a4′]

तर खऱ्या अर्थाने प्रेमलोक पार्क येथील शाळेच्या इमारतीत याचं कामकाज सुरू केलं जाईल. तेथील सर्व काम हे महापालिका पूर्ण करणार आहे. परंतु महापालिकेची ही टेंडर प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही.त्यामुळं खऱ्या अर्थाने आयुक्तलयाच कामकाज कधी सुरू होणार याच उत्तर अनुत्तरित राहात आहे. एकंदरीतच हा सर्व अनागोंदी कारभार पाहता, आयुक्तालय केवळ नावापुरत सुरू होईल अस दिसत आहे. यामुळे शहरवासीयांची सुरक्षा रामभरोसे कायम राहणार हे नक्की.