पोलीस आयुक्तांना ‘मॅट’चा दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची मुख्यालयात केलेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा परिमंडळ दोनचा पदभार देण्याचा आदेश देत मॅटने पोलीस आयुक्तांना दणका दिला आहे. नम्रता पाटील यांना परिमंडळ दोनचा पदभार दोन आठवड्यांच्या आत देण्यात यावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर आयुक्तालयातील परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त म्हणून नम्रता पाटील यांची ४ ऑगस्ट रोजी नियुक्ती करण्यात आली होती. पाच महिन्यांतच पोलीस आयुक्तांनी त्यांच्याकडून परिमंडल दोनचा पदभार काढून घेऊन त्यांची मुख्यालयात बदली केली होती. पोलीस आयुक्त हे बदली करण्यासाठी सक्षम प्राधिकारी नाहीत. त्यांनी पोलीस आस्थापना मंडळाची कुठलीही परवानगी न घेता किंवा इतर वरिष्ठ सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी न घेता ही बदली केली. त्यामुळे बदली रद्द करण्यासाठी त्यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी पोलीस आयुक्तालयाकडून ही बदली प्रशासकिय गरज म्हणून प्रभावी पोलिसिंगसाठी कऱण्यात आली आहे. आणि ही बदली नाही ही केवळ पोलीस आयुक्तालयातील प्रभावी कामकाजासाठी केलेली अंतर्गत व्यवस्था आहे. तसेच त्या या पदावर काम करण्यात असमर्थ दिसून आल्याने त्यांना मुख्यालयाचा पदभार दिल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर मॅटने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून नम्रता पाटील यांना मुख्यालयात नेमणूक केल्याचा आदेश रद्द करून परिमंडल दोनचा पदभार दोन आठवड्यात देण्याचा आदेश दिला.

पोलीस परिमंडल दोनच्या उपायुक्त पदावरून माझी मुख्यालयात बदली कऱण्याविरोधात माननीय मॅट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आमचे म्हणणे ऐकून न्यायालयाने मला दोन आठवड्यात परिमंडळ दोनचा पदभार दिला आहे. असे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनीही सांगितले.

मी शिवरायांचा आदर करतो, पण… : आ. इम्तियाज जलील