महिला पोलीस अधिकाऱ्याच्या पतीच्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हुक्का पार्लवर बंदी असताना देखील पुण्यामध्ये हुक्का पार्लर सुरु असून पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, वानवडी पोलिसांनी ज्या हॉटेलवर कारवाई केली ते हॉटेल महिला पोलीस अधिकाऱ्याच्या पतीचे असून पोलिसांनी या ठिकाणाहून हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य आणि मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.|

पोलिस  शिपाई सुधीर सोनवणे यांनी यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हुक्का पार्लर चालक राहुल मारुती बोराडे (वय 36,रा. बोराडे नगर, वानवडी) याच्या विरोधात सिगरेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने सुधारणा अधिकनियम 2018 च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडीतील साळुंके विहार रस्त्यावर सुपर फस्र्ट फॅमिली रेस्टोरंट अँड बार हे हॉटेल आहे. या हॉटेलला मद्य विक्रीचा परवाना नसताना तेथे मद्या विक्री तसेच हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती वानवडी पोलिसांना सायंकाळी मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून हुक्का ओढण्याचे साहित्य तसेच मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर मालकावर  हुक्का पार्लरचे मालक एका महिला पोलिस अधिकार्‍याचे पती असल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातल्यानंतर कायद्याात कडक शिक्षेची तरतूद केली आहे.