क्राईम स्टोरी

दापोडीत पोलिसांना मारहाण 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – अपघातानंतर मित्रांना बोलावून रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्यांना वाहने बाजूला घेन्यास सांगितले म्हणून पाच जणांनी पोलिसांना मारहाण केली. ही घटना दापोडी येथे गुरुवारी (दि.10) दुपारी एकच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन भागाजी म्हेत्रे यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर रवींद्र दादाराव कोंडगे (22), शांताराम दादाराव कोंडगे (25), वैजनाथ दादाराव कोंडगे (28), आदिनाथ दादाराव कोंडगे (38, सर्व रा. खराबवाडी, चाकण-तळेगाव रोड, चाकण. मूळ रा. मु. रांजणगाव, ता. फुलांबरी, जि. औरंगाबाद), रवींद्र अशोक व्यवहारे (22, रा. आशा बिल्डिंग, संत गजानन हॉस्पिटल समोर, मोशी) अशी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोड़ी येथील सीएमई गेटजवळ कंटेनर आणि मोटारीचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत मोटारीतील एकाने कंटेनर चालकाला मारहाणही केली होती. तसेच त्याने आपल्या साथीदारांना बोलावले होते. या सर्वानी रस्त्यात वाहने उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केला होता. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले. त्यांनी येथून बाजूला होण्यास सांगितल्याच्या कारणावरून त्यांनी गोंधळ घालत पोलिसांनाच शिवीगाळ करत मारहाण केली.

तपास भोसरी पोलिस करत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या