बुधवार पेठेतील ‘त्या’ परिसरात पोलिसांची धाड 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या बुधवार पेठेत पोलिसांनकडून धडक कारवाई करण्यात आली. बुधवार पेठेत बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान तेथील महिलांचे ओळखपत्र तपासण्यात आले, त्यावेळी १५० पेक्षा जास्त महिलांजवळ ओळखपत्र नसल्याचे समोर आले. ओळखपत्र नसलेल्या महिलांना लवकरात लवकर ओळखपत्र पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार फरासखाना पोलीस ठाण्यातर्फे १ जानेवारी पासून बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करत असणाऱ्या १५०० महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती. दरम्यान सर्वांचे ओळखपत्र पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर परिमंडळ १ पोलीस उप आयुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी उलट तपासणी केली. दरम्यान वेश्या व्यवसाय होत असलेल्या ३५ इमारतींवर चौकशी करण्यात आली. त्यावेळी महिला दुसऱ्या राज्याच्या, नाबालिक मुली, बांगलादेशी महिला बेकायदेशीर पणे तर राहत नाहीत. याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी १२५ पेक्षा जास्त मुली, आणि काही महिला यांच्या जवळ ओळख पत्र नसल्याचे आढळले. दरम्यान त्यांना ओळख पत्र दाखल करण्यासाठी आदेश देत दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, तुमच्या काही तक्रारी असतील तर आम्हाला सांगा, तसेच तुम्हाला कोना कडून त्रास होत असेल तेही आम्हाला सांगा. असे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर, यानंतर इथे बेकायदेशीररित्या जर कोणी महिला आढळल्या तर कारवाई करण्यात येईल. तसेच कोणत्याही अल्पवयीन मुलीला, किंवा कोणत्या महिलेला जबरदस्तीने इथे ठेवण्यात येत असेल तर लगेच पोलिसांना काळवावे असे आदेशही देण्यात आले.

दरम्यान ही कारवाई करत असतांना त्या ठिकाणी फिरणाऱ्या ७० ते  ८० तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा इथे फिरू नका अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी समज देत सोडून देण्यात आले.