दोन गुटखा व्यापाऱ्यांचा माल भोकर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडला 

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) – गुटख्याची तस्करी करून मार्ग बदलून जात असताना नागरिकांच्या मदतीने पोलीसांनी तस्करांना रंगे हात पकडले आहे. भोकर येथील ही घटना आहे. भोकर येथे अनेक दिवसांपासून गुटख्याची तस्करी सुरू आहे. यावेळी तस्करी थेट शहरातून सकाळी ७ वाजता होत असताना गुटख्याच्या खबरी कडून पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की गुटखा शहरात आला आहे आणि तस्कर कुठल्याही क्षणी तो भोकर येथून पळ काढू शकतो. सदर तस्कर मार्ग बदलून जात असताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने ती गाडी पोलिसांना धरून दिली व त्यावर पोलिसांनी पंचनामा केला असता त्या गाडी मध्ये १० बोरी माल वजीर नावाचा गुटखा निघाला. याचे मूळ मालक  सौदागर शाईद व असलम हे असल्याचे पोलिसांनी तपासाअंती कळविले आहे.
पोलीस निरीक्षक सुट्टीवर असल्याने ही कारवाई झाल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे.
त्यावेळी पोलीस प्रशासनाची कारवाही मध्ये ४५०००० माल वजीर गुटखा असल्याचे समजले व गाडी नवीन असलेली पिकप बोलेरो किंमत ७ लाख हा एवढा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाही सुरेश भाले सहायक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राठोड यांनी केली. गाडी क्रमांक एम एच २६ बी इ ०९२५ ही गाडी पोलीस वाहनाचे वाहन चालक जुताडे ब.न.२२५८ यांच्या हस्ते गुटखा वाहन पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले पुढील कार्यवाही त्या नंतर सुरू झाली.
भोकर पोलीस स्टेशन चे टेलिफोन बंद असल्याने त्यावेळी नागरिकांचा जमाव पाहून पोलीस अधीक्षक कार्यालय येथे थेट सी आर ओ(CRO) नांदेड ला केल्याने कार्यवाही करण्यासाठी गती वाढली होती अशी चर्चा भोकर च्या नागरिक मधून त्यावेळी होत होती. अशा अनेक गाड्या भोकर परिसरात दररोज येत आहेत त्यामुळे व्यसनाधीनता वाढत चालली आहे आरोग्य धोक्यात असल्याने गुटखा बंद होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिक चर्चा करत होते.
सदरील कार्यवाही भोकर पोलीस स्टेशन येथे दि ५ नोव्हेंबर रोजी झाल्याने अनेक गुटखा व्यापाऱ्याला आता भीती ची धडकी भरत असल्याचे यावेळी दिसून आले पण सदरील कारवाही झालेले व्यापारी छोटे असल्याने यांचा मोठा व्यापारी स्थानिकला राहून मालाची विल्हेवाट लावून ठेवल्याची चर्चा नागरिकांत होत होती.

 झालेला या कार्यवाहीचा तपास भोकर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश भाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राठोड हे करत आहेत.