‘या’ ५ नगरपरिषदांसाठी २७ जानेवारीला मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील ११ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

२ ते ९ जानेवारी २०१९ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रांची १० जानेवारी २०१९ रोजी छाननी होईल. मतदान २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल, असे ते म्हणाले.

पोटनिवडणूक होत असलेली नगर परिषद, नगरपंचायतनिहाय जागा :

राजापूर (जि. रत्नागिरी)- ६ अ,

आळंदी (पुणे)- ९ अ,
फलटण (सातारा)- १२ अ,
दुधनी (सोलापूर)- २ ब,
पन्हाळा (कोल्हापूर)- ८ क,
दिंडोरी (नाशिक)- १५,
यावल (जळगाव)- १ अ,
बीड- ११ अ,
बुलढाणा- १२ ब,
अर्जुनी (गोंदिया)-१४,
गोरेगाव (गोंदिया)-१४.