श्रीगोंदा नगरपालिकेसाठी  27 जानेवारीला मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा नगरपालिकेसाठी 27 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणुकांची जाहीर करण्यात आली आहे. त्यात श्रीगोंदा पालिकेचा समावेश आहे.
दि. 2 ते 9 जानेवारी दरम्यान इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दहा जानेवारीला उमेदवारी अर्जांची छानणी व त्यानंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी जाहीर करणे. 17 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हांचे वाटप होईल. 27 जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर होईल. त्यानंतर 28 जानेवारीला सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरूवात होईल.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आ. राहुल जगताप यांच्या पत्नीही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. तसेच माजी मंत्री बबनराव  पाचपुते हे श्रीगोंद्यात मुक्काम ठोकून आहेत.