हेल्मेट सक्ती साठी पुणेकरांनी केलं मतदान हा आला निकाल 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंलमबजावणी सुरु झाली आणि पुण्यात एकच गदारोळ सुरु झाला. अनेक पुणेकरांनी आनंदाने हेल्मेटसक्तीचं स्वागत केलं, तर अनेकांनी या निर्णयाला विरोधही केला. काहींनी तर हेल्मेटसक्तीविरोधात मोर्चे काढले, आंदोलने केली, काय काय नाही केलं. आपापल्या परीने युक्ती लढवून कित्येकांनी या निर्णयाला विरोध केला. याच अनुषंघाने पतीत पावन संघटनेने पुण्यात एक खास निवडणूक घेतली. त्यात हेल्मेटसक्तीबाबत पुणेकरांनी मतदान केले. या मतदानात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक जणांनी हेल्मेटसक्तीला विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे.
पतीत पावननं पत्रकारांच्या उपस्थितीत मतमोजणी केली. यावेळी सर्वाधिक पुणेकरांनी हेल्मेटसक्तीला विरोध दर्शवलाय. 4,007 पुणेकरांनी पतीत पावन संघटनेच्या या मतदानात सहभाग घेतला होता. तब्बल 2 हजार 838 नागरिकांनी हेल्मेटसक्तीला विरोध केलाय. तर 1 हजार 71 नागरिकांनी हेल्मेटच्या बाजूनं मतदान केलंय. तर 98 मतं बाद झाली आहेत.
पुण्यातील मंडई परिसर, कोथरुडला भारती विद्यापीठ परीसर, फर्ग्युसन महाविद्यालय, शिवाजीनगर आणि वाडिया कॉलेज  परिसरात हे मतदान घेतलं गेलं.
हेल्मेटसक्तीच्या निकालानंतर आता पतीत पावन संघटना आक्रमक झाली असून, याबाबत पोलीस आयुक्त आणि पालकमंत्र्यांना निवेदन देऊन, हेल्मेटसक्ती रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे.