प्रभू राम महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : भाजपच्या ‘या’ महिला खासदाराचं वक्तव्य 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर भारतीय मुंबईचा कणा असून महाराष्ट्र आणि उत्तर भारताचं नातं खूप जुनं आहे. महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते, असं विधान उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांनी केलं आहे. भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात खासदार पूनम महाजन यांनी उत्तर भारतीय समाजाचं तोंडभरुन कौतुक केलं.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पूनम  महाजन म्हणाल्या की, “उत्तर भारतीयांनी पुढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या समाजानं मुंबईच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्याही विकासात कायम मोलाचं योगदान दिलं आहे.

‘या’ पक्षाला अच्छे दिन ! कंपन्यांकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या 

महाराष्ट्र आणि उत्तर भारताचं नातं खूप जुनं आहे. महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते. उत्तर भारत आणि महाराष्ट्राचा संबंध अगदी प्राचीन काळापासून आहे. उत्तर भारतीय समाज तुम्हाला फक्त मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या प्रगतीत या समाजाचं योगदान अतिशय मोठं आहे.”
कार्यक्रमाला आमदार प्रकाश अळवणी, माजी नगरसेवक महेश पारकर, नितेश राजहंस सिंह, गुलाबचंद दुबे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्तर भारतीय समाजातील विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.