‘या’ ३ दिग्गजांना ‘भारतरत्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सराकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कारासाठी तीन नावांची घोषणा सरकारने केली आहे. त्यातील पहिलं नाव हे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नाव आहे. त्यांच्यासह संगितकार भूपेन हजारिका आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार जाहिर झाला आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा केली नाहीय. प्रणव मुखर्जी हे देशाचे माजी राष्ट्रपती आहेत. तसंच ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आहेत.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी दोन वेळा या पुरस्काराची घोषणा केली आहे. २०१४ मध्ये रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव आणि क्रिकेटर सचिन तेंडूलकर आणि २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिक मदनमोहन मालवीय यांना देण्यात आला होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रणव मुखर्जी यांच्यातील नात चांगले आहे. भारतरत्न पुरस्कार निवडणुकीच्या तोंडावर घोषित करण्यामागे राजकीय खेळी असण्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.