आता ‘हा’ प्रसिद्ध अभिनेताही चढणार बोहल्यावर

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. होय, गेल्यावर्षी २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता. यानंतर बरोबर वर्षभरानी म्हणजेच येत्या २२ व २३ जानेवारीला प्रतीक व सान्या विवाहबद्ध होत आहेत. लखनौत हा विवाह सोहळा होणार आहे. यानंतर मुंबईत या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल.
गेल्या आठ वर्षांपासून सान्या व प्रतीक एकमेकांना दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सान्या ही मूळची लखनौची आहे.  सान्या ही रायटर, डायरेक्टर व एडिटर आहे. एका राजकीय नेत्याची मुलगी असलेली सान्या साखरपुड्याच्या सहा महिन्यांपूर्वीच लंडनहून पोस्ट गॅज्युएशन करून परतली होती.
ऑगस्ट २०१७ मध्ये प्रतीकने आपल्या व्यसनाबद्दल धक्कादायक खुलासा करत सांगितले. अपयश आणि अभिनेत्री एमी जॅक्सनसोबतच्या ब्रेकअपमुळे मी हतबल झालो होतो. यातूनच मी ड्रग्जच्या आहारी गेलो. फर्स्ट इयरला असताना मित्रांनी माझी ड्रग्जशी ओळख करून दिली आणि मी या गर्तेत सापडलो. आता मी यातून पूर्णपणे बाहेर आलोय. आता माझा सर्व फोकस माझ्या कामावर असणार आहे. लवकरच प्रतीकचा ‘छिछोरे’ हा चित्रपट रिलीज होतोय.
प्रतीकने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. पण या चित्रपटांना फार यश मिळू शकले नाही.