ती प्रसुतिकरिता आली अन् लिफ्टमधे अडकली

पुणे – पोलीसनामा ऑनलाईन   –  काल (सोमवार) मध्यरात्री तीन वाजता ससुन रुग्णालयाच्या क्रमांक तीनच्या लिफ्टमध्ये लोक अडकल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. दलाने नायडू अग्निशमन केंद्र व मुख्यालय येथून दोन वाहने तातडीने रवाना केली. जवान अवघ्या काही मिनिटातच ससुन रुग्णालयात पोहोचले. पण परिस्थिती गंभीर होती. लिफ्टमधे प्रसुतिकरिता शासकीय रुग्णवाहिकेतून आलेली महिला तसेच डॉक्टर व इतर चार असे एकूण सहाजण अडकल्याचे जवानांनी पाहिले. महिलेची अवस्था पाहून जवानांनी केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव काम सुरु केले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ba30b31-d132-11e8-8ab3-03858a08cc26′]
घटनास्थळी लिफ्टमधे तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे दिड वाजण्याच्या सुमारास हे सहाजण अडकले होते. त्यामधे शासकीय रुग्णवाहिकेतून प्रसुतीकरिता तातडीचे म्हणून एका महिलेला प्रसुतिची वेळ असल्याने उपचाराकरिता आणले होते. परंतू, ती महिला व स्वत: रुग्णवाहिकेतील डॉक्टर व इतर चार या लिफ्टमधे तळमजला व पहिल्या मजल्याच्या मधोमध अडकून पडले. लिफ्टमधून मोबाईलवर कोणाशीही संपर्क होत नव्हता.  सुमारे तासाभरानंतर अग्निशमन दलाला वर्दि दिली गेली. जवानांनी लिफ्टच्या डक्टमधे प्रवेश करुन  व इतर जवानांनी लिफ्टच्या बाहेर खुर्ची ठेवून कौशल्याने तीस मिनिटातच गरोदर महिलेला अक्षरश: खांद्यावरुन बाहेर घेत  इतर ही लोकांची सुखरुप सुटका केली. तेथील डॉक्टर्स, वॉर्ड बॉय व इतर लोकांनी टाळ्या वाजवून दलाच्या जवानांचे कौतुक केले.
या बचाव कामगिरीमधे नायडू अग्निशमन केंद्राचे अधिकारी विजय भिलारे, तांडेल तानाजी मांजरे, चालक करिम पठाण, ज्ञानेश्वर भाटे व जवान जयेश गाताडे, विजय पिंजण, विष्णू जाधव, रवि जाधव, विनायक माळी, अक्षय दिक्षित यांनी सहभाग घेत एका गरोदर महिलेला व तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाला मोठे जीवदानच दिले.