‘या’ विकसित तंत्रज्ञानामुळे होणार पॅरालिसिसचा धोका कमी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – विकसित होत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्र विकसित होत आहेत. विकसित तंत्रज्ञानामुळे केवळ  विज्ञानक्षेत्रालाच याचा फायदा झाला नसून यामुळे चिकित्सा क्षेत्रामध्येही विकास झाला आहे. या विकसित तंत्रामुळे अनेक गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे. आणि यामुळे रुग्णांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे .आता शास्त्रज्ञांनी तर मेंदूतील ‘न्यूरॉन्स’ला नियंत्रित करण्याचे ‘वायरलेस’ तंत्रज्ञान विकसित केले आहे.
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाकडून देण्यात येणारी सूचना ही ‘न्यूरॉन्स’च्या माध्यमातूनच मेंदूपर्यंत पोहोचते. शास्त्रज्ञांनी अशी एक ‘वायरलेस सिस्टीम’ विकसित केली आहे की, तिच्या मदतीने मेंदूतील न्यूरॉन्सला नियंत्रित करता येऊ शकते. यामुळे वेदनांची संवेदना कमी केली जाऊ शकते. तसेच तांत्रिकासंबंधीच्या गंभीर आजारांचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. ‘ओप्टोजेनेटिक्स’ असे एक जैविक तंत्रज्ञान आहे की त्यामुळे मेंदूतील विशिष्ट नूरॉन्स समूहांना सक्रिय अथवा अक्रिय केले जाऊ शकते.

या ‘ओप्टोजेनेटिक्स’ तंत्रज्ञानामुळे पॅरालिसिचा धोका कमी केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वेदनांची अनुभूती करणार्‍या न्यूरॉन्सना नियंत्रित करता येऊ शकते. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर फिलीप गुटरूप यांनी सांगितले की, मेंदूचे वेगवेगळे भाग कशा पद्धतीने काम करतात, हे समजून घेण्यासाठी प्रत्येक प्रकारचे यंत्रे तयार करण्यात आली आहेत. हे संशोधन ‘नेचर इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.