थर्ड आय

मोबाईल बॅटरी संदर्भात हे नियम पाळाच ,नाहीतर होऊ शकतो ब्लास्ट 

वृत्तसंस्था : मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पहिली असतील यापूर्वी चायनामेड किंवा चांगला दर्जा नसलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटना आहेत. पण सर्वात आधी Nokia कंपनीच्या मोबाईलच्या BL-5C या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता स्मार्ट फोनच्या बॅटरींमध्ये देखील स्फोट झाल्याच्या घटना आहेत.

बॅटरी स्फोटाच्या काही घटना
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये Samsung Galaxy Note 9 च्या बॅटरीचा स्फोट झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. ही तक्रार एका अमेरिकेतील महिलेने केली होती. तिने नोंदवलेल्या तक्रारीनुसार ती जेव्हा लिफ्टमध्ये होती तेव्हा तिचा फोन खूप गरम झाला होता. त्यानंतर तिने फोन बंद केला आणि बॅगमध्ये ठेवला. काही वेळानंतर तिला शिट्टी वाजवल्या सारखा तीव्र आवाज आला आणि कशाचा तरी स्फोट झाला हे लक्षात आले. तिच्या पर्समधून धूर निघत होता.

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्येही एका व्यक्तीचा स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला होता. मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट असे अपघात अनेकदा आपल्या चुकांमुळे होतात.

यापूर्वी फोनवर बोलत असतानाच एकाच्या मोबाईल मधील बॅटरीचा स्फोट झाल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. पण तुम्हाला माहिती आहे का ? मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होण्यामागे कोणती करणे आहेत ? मोबाईलची बॅटरी धोक्यात आहे हे कसे ओळखायचे ? बॅटरी बाबत काय सतर्कता बाळगावी ? चला जाणून घेऊया.

१)चुकूनही फोन चार्ज करताना वापरू नका
मोबाईल चार्जिंग होत असताना कॉल आला तर चार्जिंग चालू ठेऊन बोलण्याची सवय अनेकांना असते पण ही सवय धोकादायक आहे. मोबाईल चार्ज करताना त्याच्या जवळपास हाय रेडिएशन असतात. यामुळे बॅटरी गरम होते आणि चार्जिंग करताना फोनवर बोलल्यास ब्लास्ट होऊ शकतो. अनेक युझर्सच्या चुकांमुळे बॅटरी ओव्हरहीट झाल्यामुळे ब्लास्ट होते. याशिवाय बॅटरीचे सेल डेड होत राहतात ज्यामुळे फोनच्या आत केमिकल चेंजेस होतात आणि बॅटरी ब्लास्ट होते.

२) तुमच्या फोनची बॅटरी धोक्कादायक अवस्थेत आहे ?

— फोनची स्क्रिन ब्लर होणे किंवा स्क्रीन पूर्णपणे काळी होणे.
— फोन वारंवार हँग होणे किंवा प्रोसेसिंग स्पीड स्लो होणे
— फोनवर बोलताना मोबाईल सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात गरम होतो.

३) तुमच्या फोनची बॅटरी खराब तर नाही ना ? करा चेक

— जर बॅटरी रिमूव्ह करण्याचा विकल्प आहे तर ती काढून टेबलवर ठेवा. त्यानंतर त्याला फिरवून बघा. जर बॅटरी फुगली असेल तर ती टेबलावर वेगात फिरणार. अशा बॅटरीचा वापर करू नका.
— ज्या स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट बॅटरी असते त्यांना हीटमुळे ओळखता येते. फोन गरम होत असल्यास सर्व्हिसिंग सेंटरमध्ये न्या. २० टक्के बॅटरी शिल्लक असल्यावर फोनला चार्जिंगवर लावा. बॅटरी पूर्ण ड्रेन होऊ देऊ नका. पूर्ण बॅटरी संपल्यावर चार्जिंगवर लावल्यास जास्त पावर सप्लायची गरज पडते. यामुळे पण बॅटरी ब्लास्ट होऊ शकते.

४) बॅटरीसंदर्भात ‘या’ चुका करू नका

— कधीही डुप्लिकेट चार्जर, बॅटरी आदींचा वापर करु नका. ज्या ब्रांडचा मोबाईल तुम्ही वापरत आहात त्यांच ब्रांडचा चार्जर वापरा.
— कधीही चार्जरच्या पिनला भिजू देऊ नका. जर असे झालेच तर पूर्णपणे वाळल्यानंतरच चार्जवर लावा.
— फोनची बॅटरी खराब झाल्यावर त्याला त्वरित बदला. नेहमी ब्रांडेड आणि ओरिजिनल बॅटरी वापरा.
— फोनला कधीही १०० टक्के चार्ज करू नका. फोनला ८० ते ९० टक्केच चार्ज करा. यापेक्षा जास्त चार्ज झाल्यावर फोन ओवरचार्ज होऊ शकतो आणि ब्लास्ट होण्याचा धोका असतो.
— रात्री मोबाईल चार्जिंगला लाऊन सोडून देऊ नका. असे केल्याने बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकते.
— फोनला कधीही गरम असलेल्या जागेवर ठेवू नका आणि चार्जही करू नका.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button