शिवसेनेच्या दिलजमाईसाठी नरेंद्र मोदी घेणार युतीचा पुढाकार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना आणि भाजप यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर निर्माण झाले असताना आता दस्तुर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी युतीसाठी सूत्र हलवणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे. सत्तेत एकत्र राहिल्याने वर्चस्वाच्या लढाईत दोन्ही पक्षांचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. राज्यातील भाजप नेत्यांनी शिवसेनेला नेहमीच गृहीत धरले नाही म्हणून शिवसेना नाराज आहे. सत्तेत आल्यावर शिवसेनेची जी ध्येय धोरणे राबवायची होती. त्या ध्येय धोरणाला भाजपने बगल दिल्याने शिवसेना नाराज आहे म्हणून युतीची चर्चा करण्याअगोदर शिवसेना भाजपवर चांगलेच तोंड सुख घेऊ लागली आहे.

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे येणार एकाच मंचावर ?

२३ जानेवारीला स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्यासाठी आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येण्यासाठी भाजपने शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच फक्त मध्यस्ती चालून हि युतीची कोंडी फुटू शकते असे भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांना वाटते म्हणून शिवसेनेची दिलजमाई करण्यासाठी भाजपला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा मोठा जादूगार पक्षात शोधून सापडत नाही. म्हणून नरेंद्र मोदी यांनाच युतीची जादू करण्यासाठी सामोरे पाठवले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी महत्वाकांक्षी असलेला  समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्याच प्रमाणे या महामार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर शिवसेना युतीच्या बैठकीसाठी बिछायत टाकणार का असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे.

भाजपचे दिल्लीत महाअधिवेशन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आज दिल्ली या ठिकाणी महाअधिवेशन पार पडते आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र भाजपच्या सुकाणू समितीचे सर्व सदस्य दिल्लीला गेले आहेत. या अधिवेशनात लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती कशी असावी यावर विचार मंथन केले जाणार आहे.

काल आदित्य ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले होते तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा फाॅर्म्युला ठरला आहे, फक्त घोषणा होणे बाकी आहे आणि हि घोषणा शिवसेनेच्या हातात आहे. म्हणून येत्या काळात युतीच्या दृष्टीने मोठ्या हालचाली होणार असल्याचे चित्र सध्या राज्याच्या राजकारणात दिसते आहे.