पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस कारावास

मुक्रमाबाद (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईन

आरोपीला अजामीनपात्र वारंट बजावण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीने दगडाने मारहाण करुन जखमी केले होते. हा प्रकार मुखेड तालुक्यातील मनू (तांडा) येथे २०१६ मध्ये घडली होता. यातील आरोपीला मुखेड प्रथम श्रेणी न्यायालयाने दोषी ठरवत अकरा महिने पाच दिवस कारावास आणि दोन हजार शंभर रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश नम्रता बिरादार यांनी ठोठावली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5bbf43ce-ccad-11e8-8b8b-b5c887442978′]

मुक्रमाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनू (तांडा) येथील मारोती किसन चव्हाण (वय ४५) या आरोपीस  पोलिस कर्मचारी बि. एल. चिट्टलवाड व कातपुरे हे ९ ऑगस्ट २०१६ ला मुखेड न्यायालयाचे आजामीनपात्र वारंट बजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना अश्लिल भाषेत शिवागाळ करत त्यांच्यावर दगडफेक करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. त्याप्रकरणी चिट्टलवाड, यांच्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी विरोधात मुखेड न्यायालयात सबळ पुराव्यासह दोषारोप सादर केले होते.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’618dc771-ccad-11e8-9866-859a12b84580′]

न्यायालयाने सदरील पुराव्याची पडताळणी करून प्रथम श्रेणी न्यायाधीश नम्रता बिरादार, यांनी मारोती किसन चव्हाण याला दोषी ठरवत अकरा महीने पाच दिवसाचा कारावास व दोन हजार शंभर रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅन्ड, चवरे यांनी बाजू मांडली.

माजी महापौरांसह अनेकांना गंडा घालणारा गजाआड