प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय ; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
प्रियांका गांधी यांना काँग्रेस पक्षाचं सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. गुलाम नबी आझाद यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलं. आझाद यांच्याकडे आता हरियाणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेश (पूर्व)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  उत्तर प्रदेशासाठी काँग्रेसने पहिल्यांदाच दोन सरचिटणीसांची नियुक्ती केली आहे.
प्रियांका गांधी या  राजकारणात सक्रिय प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मागणी अखेर आज पूर्ण झाली. प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत.