पुण्यात संतापलेल्या प्राध्यापकाने जाळल्या पदव्या  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोणत्याही सुशिक्षित व्यक्तींकरिता त्याच्या शिक्षणाच्या पदव्या म्हणजे त्याच्याकरिता अतिशय महत्वाच्या असतात . मात्र पुण्यातील एका संतापलेल्या प्राध्यापकाने चक्क आपल्या पदव्या जाळून टाकल्याची घटना घडली आहे. याचे कारणही तसेच आहे. या प्राध्यापकाला पगार मागितला म्हणून नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे संतापलेल्या पारध्यापकाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सूरज बाळासाहेब माळी असं या प्राध्यापकाचं नाव आहे.

सूरज माळी हे सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजिनीयरींगमध्ये प्राध्यापक आहेत. थकीत पगार मागितल्याने या महाविद्यालय प्रशासनाने त्यांना पगार देण्यास नकार दिला. काम करणं हा गुन्हा असेल आणि पगार मागितला म्हणून कामावरून काढलं जात असेल तर आजवर मिळवलेल्या पदव्या आणि प्रमाणपत्रे हवेत कशाला? अशा शब्दांत संताप व्यक्त करत माळी यांनी घरातच गॅस पेटवून त्यावर एकएक करत पदव्या जाळल्या. सिंहगडमधील शिक्षकांना बँक कर्जही देत नाही. त्यामुळे माझा कामावरचा विश्वास उडाल्याचंही माळी यांनी सांगितलं. माळी यांनी पदव्या जाळत असल्याचा एक व्हिडिओही तयार केला असून तो सर्वत्र व्हायरलही झाला आहे.