देशी-विदेशी दारुसह साडे बारा लाखाचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन-अवैधरित्या देशी-विदेशी दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या पाच जणांना खंडणी व दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडील १२ लाख २० हजार १९५ रुपयांचा माल जप्त केला.

सिद्धांत सानप (२६), गजानन रामराव बांगर ( ३२, दोघे रा. वाघजाईनगर, चाकण-तळेगाव रोड, चाकण, पुणे), स्वप्निल विलास काकडे (२६, रा. पालघरे वस्ती, चिखली, पुणे), संदीप भानुदास जांभुळकर (२८, रा. माणिक चौक, चाकण, पुणे) व संतोष राजाराम सुरवसे (३५, रा. पवारनगर, थेरगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

खंडणी व दरोडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई आशिष बनकर यांना मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक चाटे, राजेंद्र शिंदे, अशोक दुधावणे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, शरीफ मुलाणी, विक्रांत गायकवाड, आशिष बनकर, गणेश कोकणे या पथकाने सापळा रचला. वाघजाईनगर चाकण-तळेगाव रोड येथील पुना वाईन शॉपमधील देशी-विदेशी दारु व बियर असा १ लाख ७० हजार १९५ रुपयांचा माल चाकणमधील हॉटेल व धाब्यांवर विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. यावरून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या महिंद्रा इको टेम्पो व मारुती सुझुकी रिट्ससह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.