ताज्या बातम्या

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवली साखर कारखान्यांची कार्यालयं

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- सांगली जिल्ह्यात उसाच्या एफआरपीचे आंदोलन चिघळले असून एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील चार साखर कारखान्यांच्या नोंदणी कार्यालयांना देखील टाळे ठोकण्यात आले असून. एकरकमी भाव मिळावा यासाठी वाळवा तालुक्यातील दोन साखर कारखान्याची कार्यालयं देखील पेटवून देण्यात आली आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनना का झाली आक्रमक 

तब्बल दोन महिन्यांनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा केली. मात्र हा एफआरपी एकरकमी न  देता पहिली उचल म्हणून 2300 रुपये जमा केले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याविरोधात सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनात हिंसक पवित्रा घेतला असून. आज सकाळी वाळवा तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि घोगाव येथील क्रांती साखर कारखान्यांची कार्यालये देखील पेटवून देण्यात आले.

… अन्यथा कारखाने चालू देणार नाही 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज संध्याकळी मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे आंदोलन केले. म्हैसाळ मधील मोहनराव शिंदे आणि सांगलीच्या दत्त इंडिया साखर कारखान्याच्या नोंदणी कार्यालयांना देखील टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर स्वाभिमानीने शेजारच्या कर्नाटक राज्यातील कागवाड येथील शिरगुप्पे आणि शिवशक्ती शुगर कारखान्याच्या नोंदणी कार्यालयांना टाळे ठोकले. तसेच याठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात अली. त्याचबरोबर कारखानादारांनी मान्य केलेल्या कायद्यानुसार एकरकमी एफआरपी दिला पाहिजे आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कारखाने चालू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या