ताज्या बातम्या

पबजी गेम ड्रग्जपेक्षाही धोकादायक ; परीक्षेआधी ‘पबजी’ वर बंदी घाला

श्रीनगर : वृत्तसंस्था – देशात पबजी वेडे लाखोंच्या संख्येने आहेत. पबजी खेळणाऱ्यांना वेळेचा भानही राहत नाही. मात्र पबजी गेममुळे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येऊ नये म्हणून जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने परीक्षा जवळ आल्याने पबजीवर गेमवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.

फेब्रुवारी – मार्च या महिन्यांमध्ये १० वी आणि १२ विच्या परीक्षा सुरु होणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर नसून दिवसभर पबजी खेळण्यावर आहे. विशेष म्हणजे लाखोंच्या संख्येने विध्यार्थी वेळेचे भान न ठेवता पबजी खेळत आहेत. दरम्यान पबजी गेममुळे विध्यार्थी नापास होऊ नयेत. त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये. ही भीती व्यक्त करीत जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे पबजी गेममुळे मुलांचे भविष्य बिघडत आहे. त्यामुळे यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

पबजी गेम हा ड्रग्जपेक्षाही धोकादायक आहे. मुले अभ्यास करणे सोडून दिवसभर पबजी गेम खेळतात. असे या मागणीत म्हंटले आहे. यावेळी जम्मू-काश्मीर विद्यार्थी युनियनचे अध्यक्ष अबरार अहमद, विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष राफीक मखदुमीने. आदी उपस्थित होते.

विशिष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये याआधीही पबजीवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. काही दिवसापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये सतत १० दिवस पबजी खेळल्याने एका फिटनेस ट्रेनरचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये पबजीवर बंदी घालण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या