दहशतवाद संपवण्यासाठी काश्मीरच्या पर्यटनावर बंदी घाला : शिवसेना 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जमिनीवर कुठे स्वर्ग असेल तर तो फक्त कश्मीरमध्येच आहे असे एका कवीने आपल्या कवितेत म्हणले आहे. काश्मीरचे पर्यटन पाहण्यासाठी जगभरातून आणि भारत भरातून लोक काश्मीरमध्ये येताच. काश्मीरची अर्थव्यवस्था हि पर्यटन व्यवसायावर बरचशी अवलंबून आहे. याचाच धागा पकडून शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दहशतवादावर टीका केली आहे.

कश्मीर मध्ये पर्यटनाच्या माध्यमातून पैसे खेळता राहतो. त्याच पैशाच्या माध्यमातून कश्मीरमध्ये दहशतवाद फोफावतो. त्यामुळे सरकारने काश्मीरच्या पर्यटनावर फक्त २ वर्षे बंदी घातली तरी कश्मीर मधील दहशतवाद थांबण्यास मदत होईल असे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे. त्या एवढेच बोलून थांबल्या नाहीत तर त्यांनी हिंदूनी अमरनाथ यात्रेला हि दोन वर्ष जाऊ नये असे देखील म्हणले आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका विचारायला गेलेल्या पत्रकाराला मनिषा कायंदे यांनी हे उत्तर दिले आहे. पर्यटनावर बंदी घातल्यावर समजेल कि नेमका दहशतवाद कोणत्या मार्गाने येतो आहे. तसेच याला रसद कोठून मिळते आहे असे मत मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला, जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे असे म्हणले आहे. यातून सरकार सर्जिकल ट्राइक करण्याच्या तयारीत असल्याचे देखील समजते आहे. या सर्व शक्यतेला अधिकृत दुजोरा मात्र मिळत नाही.