पाक विरोधातील कंगनाचे वक्तव्य ‘या’ अभिनेत्रीच्या जिव्हारी  

मुंबई : वृत्तसंस्था – आपल्या बेधडक वक्तव्यामुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौतने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निशाणा साधला होता. या हल्ल्याचा निषेध करत कंगना राणौतने आपला संताप व्यक्त केला होता. आता वेळ आली आहे,  पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची. पाकिस्तानने केवळ आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर हल्ला केला नाही तर आपल्याला आव्हान दिले आहे. आणि भारताच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवून आपला अपमान केला आहे. केवळ इतकेच बोलून कंगना थांबली नाही तर पुढे म्हणाली, या हल्ल्यानंतर जो शांततेबद्दल बोलेल त्याचे तोंड काळे करा. आणि त्याची गाढवावरून धिंड काढा.

पण कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी लागला आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्यानंतर रबिया भट्ट हिने कंगनावर निशाणा साधला आहे. कंगना संधीसाधू आहे. व्यवसायात समस्या येऊ लागल्या की काही लोक ‘नॅशनल कार्ड’ खेळतात, असे ट्विट रबियाने केले असून या ट्विटमध्ये तिने कंगनाला टॅग केले आहे. कंगनाने पाक विरोधात केलेले वक्तव्य रबियाला जराही आवडलेले नाही. त्यामुळेच तिने कंगनावर निशाण साधला आहे. अद्याप रबियाच्या या ट्विटवर कंगनाने काही उत्तर दिले नाही.

कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट २५ जानेवारीला रिलीज झाला होता. नुकतीच या चित्रपटाची १०० कोटीं क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.  ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन १६ फेब्रुवारीला केले होते. पण पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कंगनाने ही पार्टी रद्द केली होती.