‘सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू अडचणीत आले आहेत. सिद्धू यांच्याविरोधात अनेकांनी समाज माध्यमांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर सोनी टीव्हीनं ‘द कपिल शर्मा शो’ मधून सिद्धू यांची हकालपट्टी केली. यावरुन आता  BJP  मधील खासदार, अभिनेता परेश रावल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार असल्याचा टोला अभिनेता परेश रावल यांनी लगावला. जम्मू-कश्मीर मधील पुलवामातील हल्ल्यावरून केलेल्या विधानामुळे पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू समाज माध्यमांवरच्या रडावर आहेत. काल बॉयकॉट सिद्धू हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये होते. द कपिल शर्मा शोमधून सिद्धू यांना काढून टाका, अशी मागणी जोर धरू लागली होती. दबाव वाढल्यानंतर त्यांना शोमधून घरचा रस्ता दाखवण्यात आला. दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो. दहशतवाद्यांना कोणाताही जात नसते, असं भारताचे माजी क्रिकेटर सिद्दू यांनी म्हटलं होतं. संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवा,  असंदेखील ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र भारतामधून टीका झाली होती.

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरातील दहशतवादी झालेल्या हल्यात तब्बल अडीच हजार सीआरपीएफ जवानांचा ताफा जात असताना त्यातील एका बसला कारनं धडक दिली. या कारमध्ये तब्बल 200 किलो स्फोटकं होती. आदिल अहमद दार या दहशतवाद्यानं हा आत्मघाती हल्ला घडवला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. तर अनेकजण जखमी झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.