पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली ; विराटने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या खेळात उल्लेखनीय कामगिरी बजावत असतोच. विराटने पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहीली आहे. त्यासाठी त्याने एक निर्णय घेतला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर विराटने RP-SG Indian Sports Honours हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलला आहे. शनिवारी हा पुरस्कार सोहळा पार पडणार होता. मात्र पुलवामा हल्ल्याने पूर्ण देश दुःखात असल्याने त्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विराटने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्य़ाला विराटे सलाम केला आहे. या आव्हानात्मक प्रसंगात आपण जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं, विराटने सांगितलं. तसंच Indian Sports Honours हा पुरस्कार पुढे ढकलण्यात आला आहे.

Indian Sports Honours हा पुरस्कार विराट कोहली फाऊंडेशन आणि आरपी संजीव गोएंका सुमहाकडून आयोजित करण्यात येणारा पुरस्कार सोहळा आहे. विराटने या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यासोबत भारतीय क्रीडाक्षेत्रातील बहुतेक खेळाडूंनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरम्यान, देशात सर्वत्रच या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे. त्यात दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. तसंच या हल्ल्याचा बदला घेण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे. भारतीयांच्या मनात दहशतवाद्यांविरोधात रोष आहे.