असा केला विरोध चक्क खेचराला घातली ‘पुणेरी’ पगडी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्वाच्या क्षणांपैकी एक क्षण म्हणजे पदवीदान समारंभ. या समारंभासाठी पोशाख ठरलेला असतो तो म्हणजे काळा गाऊन आणि काळी टोपी हा समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात नवीन पोशाखाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेचरालाच पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले होते. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ ची जागा नवीन पोशाखाने घेतली. शुक्रवारी विद्यापीठात पदवीदान समारंभ पार पडला. या प्रसंगी कुडता, पायजमा, उपरणे आणि पगडी असा पोशाख होता. या समारंभाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले. पुणेरी पगडी नको फुले पगडी हवी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले आणि त्यांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा आकाश झांबरे आणि अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पदवी प्रदान समारंभ सुरु असताना काही विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी सभामंडपात घोषणा देऊ लागले. या घोषणातून कुलगुरू नितीन करमळकर यांना केंद्रित केले गेले आणि या बदललेल्या पोशाखाचा निषेद करण्यात आला. घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीसांनी अटक करून कार्यक्रम स्थळावरून दूर केले. तर विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे विद्यापीठाचे वातावरण मात्र चांगलेच दूषित झाले होते. कार्यक्रमाच्या सभामंडपात गदारोळ माजल्याने उपस्थितीमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. तर मला कोणत्याही पोशाखा मध्ये आलो असतो तरी आनंदच झाला असता. आज पारंपारिक पोषाखात आल्याने अधिकचा आनंद झाला असून संघटना आणि विद्यापीठ यापुर्वी सर्व बाबीवर चर्चा होण्याची आवश्यकता होती. असे निलेश भापकरने सांगितले. राज्यातील अनेक भागातील विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत असून त्याकडे समाजातील प्रत्येक घटकाने लक्ष देण्याची गरज आहे. तर अशा वादात कोणी पडू नये आणि वेळ वाया घालवू नका, अशी भूमिका पूर्वा कुंभारने मांडली.