रात्री 11 वाजता सारसबाग कॅनॉल मध्ये दाम्पत्याची उडी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवारी रात्री  एका दाम्पत्याने  पुण्यातील सारसबाग येथील विपश्यना केंद्र कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील सारसबाग येथील विपश्यना केंद्र कॅनॉल मध्ये प्रदीप शेंडगे आणि त्यांच्या पत्नी कांचन शेंडगे यांनी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. काही काळाने दोघे जण कॅनॉल मधील एका झाडाला धरून आल्याचे आढळले. कॅनॉल मधील पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने दोघेही जण कॅनॉलच्या बाहेर पडू शकले नाही.

विशेष म्हणजे पत्नी कांचन शेंडगे यांनी आधी कॅनॉल मध्ये उडी मारली आणि नंतर पती प्रदीप शेंडगे यांनी कॅनॉल मध्ये उडी मारली असावी असा अंदाजा वर्तवल्या जात आहे.  बुधवारी (7 नोव्हेंबर) रात्री अकरा वाजता ही घटना घडली असून. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने या दाम्पत्याला सुखरुप बाहेर काढले आहे.

शेंडगे दाम्पत्याचे कॅनॉल मध्ये उडी मारण्याचे मुख्य कारण अद्यापही समजू शकले नाहीये.  याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.