पुणे पोलिसांकडून दोन वाहनचोरांना अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने केलेल्या कारवाईत दोन वाहन चोरांना अटक केली आहे. या चोरट्यांकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.२६) करण्यात आली.

रविंद्र उर्फ वकाशा बाळासाहेब भोसले (वय-२१ रा. पाण्याचे टाकी जवळ तरवडे वस्ती महमदवाडी, पुणे), अक्षय उर्फ बॉन्ड्या बाळासाहेब सोनावणे यांना अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53238a35-c309-11e8-a704-cd4b47a07e9e’]

वानवडी पोलीस ठाण्यातील तपासी पथकाचे पोलीस शिपाई देशमुख यांना वाहन चोरी करणारे गुन्हेगार हद्दीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भसोले आणि सोनवणे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी वानवडी, कोंढवा, हडपसर, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ५ दुचाकी जप्त करुन पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई परिमंडळ-५ चे पोलीस उप-आयुक्त प्रकाश गायकवाड , वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रावसाहेब भापकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, सहायक पोलीस फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार निसार खान, पोलीस शिपाई योगेश गायकवाड, पोलीस शिपाई नवनाथ खताळ, पोलीस शिपाई सुधीर सोनवणे यांच्या पथकाने केली.

भावजयीने दगड मारल्याने नणंद जखमी
वडगाव मावळ : मागील काही वर्षांपासून सासर सोडून माहेरी येऊन राहत असलेल्या नणंदेच्या डोक्यात भावजयीने दगड घातला. यामध्ये नणंद गंभीर जखमी झाली. मीरा सुनील सावंत (वय ३०, रा. दिवड, ता. मावळ, जि. पुणे) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गंगुबाई कैलास सावळे (रा. दिवड, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा यांचा आठ वर्षांपूर्वी सुनील यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी पतीला दारूचे व्यसन जडले. सुनील वारंवार दारू पिऊन तो मीरा यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असे. दरम्यान मीरा यांना दोन मुले झाली. परंतु सुनील याचे दारूचे व्यसन आणि त्यातून होणारा त्रास कमी होत नसल्याने मीरा यांनी सासर सोडून माहेर गाठले. मागील पाच वर्षांपासून त्या माहेरी त्यांच्या घरी राहत होत्या.माहेरी राहत असताना त्यांच्या भावाची बायको गंगुबाई यांच्यासोबत भांडण होत होते. गुरुवारी रात्री मीरा घरात झोपल्या असताना गंगुबाईने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने मोठा दगड डोक्यात घातला.