कुख्यात दरोडेखोरांना पुणे पोलिसांनी केले जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अॅमेझॉन गोडाऊनवर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्यातील ३ आरोपींना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचे इतर दोन साथिदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सत्यवान उर्फ आप्पा श्रीमंत गाडगे (रा. वाघेश्वरनगर, वाघोली), निशांत अनिल ननावरे (रा. कृष्णानगर, हडपसर), आकाश अशोक राठोड (रा. वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अॅमेझॉन गाेडाऊनवर २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास पाच जणांनी दरोडा टाकला होता. यामध्ये गोडाऊनमधील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला होता. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पिंगळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपास करुन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुणे शहरात आणखी गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

हि कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग सुनिल फुलारी, परिमंडळ ४ चे पोलीस उप आयुक्त प्रसाद अक्कानवरु, येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, तपास पथकातील पोलीस कर्मचारी अशोक आटोळे, पुष्पेंद्र चव्हाण, विश्वनाथ गोणे, संजय आढारी, प्रशांत कापुरे, विशाल गाडे, वसिम सय्यद, विनोद महाजन, राहुल मोरे, सोमनाथ खळसोडे यांच्या पथकाने केली.