गांजाची विक्री करणारी महिला पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा येथील कंजारभाट वस्तीमध्ये असलेल्या श्रीकृष्ण मंदीरासमोर गांजा विक्रीसाठी आलेल्या एका महिलेला येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून ४ हजार २२० रुपयांचा २५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१) करण्यात आली.

चमेलीबाई पदेडीयासिंग बांटुंगे (वय-६५ रा. कंजारभाट वस्ती, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हद्दीमध्ये दुपारी गस्त घातल असताना एक महिला श्रीकृष्ण मंदीरासमोर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीसन नाईक मनोज कुदळे यांना मिळाली. कुदळे यांना याची माहिती वरिष्ठांना देली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिसांनी श्रीकृष्ण मंदीरासमोर सापळा रचला. आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्या कंबरेला असलेल्या पिशवची झडती घेण्यात आली. त्यावेळी पिशवीमध्ये गांजा सापडला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

ही कारवाई परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहीते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक रविंद्र गवारी, सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट, पोलीस हवालदार हणमंत जाधव, अजिज बेग, गणेश कुंवर, मनोज कुदळे यांच्या पथकाने केली.

जाहिरात

ई – टॉयलेटमध्ये स्फोट; नागरिक भयभीत

नवी मुंबई : घणसोली येथील ई – टॉयलेटमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. या स्फोटात कोणीही जखमीझालेलं नाही. मात्र, या स्फोटामुळे झालेला आवाज आणि पत्र्याचे लांबपर्यंत उडालेल्या तुकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा स्फोट नेमका कशामुळे  झाला याचा स्थानिक पोलीस तपास करत आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

जाहिरात