पोलीस घडामोडी

पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांचा अधिकार्‍यांना सुखद धक्का

एसपींकडून जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांना शुभेच्छांसह मिठाई वाटप

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन – सांगलीत पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांना एक सुखद धक्का दिला आहे. पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यापासून त्यांनी एक वेगळीच कार्यशैली अवलंबली आहे. या दिवाळीला शर्मा यांनी सर्व प्रभारी अधिकार्‍यांना शुभेच्छांसह मिठाई दिल्याने जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकार्‍यांना सुखद धक्काच मिळाला आहे. विशेष म्हणजे खुद्द एसपींकडून शुभेच्छा मिळाल्याने अधिकारी भारावून गेले आहेत.
शक्यतो पोलिस दलात वरीष्ठ अधिकार्‍यांनाच शुभेच्छा, मिठाई देण्याचा आजपर्यंत प्रघात होता. मात्र अधिक्षक शर्मा या गोष्टीला अपवाद ठरले आहेत. त्यांनी पोलिस कर्मचारी पाठवून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांना शुभेच्छांसह मिठाई पोहोच केली. दिवाळीत पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना अनेकांकडून शुभेच्छा मिळत असतात. परंतु इथे तर खुद्द एसपींकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत.
सर्व अधिकाऱ्यांना शर्मा यांनी शुभेच्छा तर दिल्याच, मात्र चांगल्या कामाच्या सदैव पाठीशी रहाणार असल्याची ग्वाहीसुद्धा शर्मा यांनी दिली आहे. अधिकार्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांनी जिल्ह्यात एक वेगळाच पायंडा पाडला आहे. विशेष म्हणजे पोलिस अधिकार्‍यांमधून त्याचे स्वागत केले जात आहे. स्वतः एसपींकडून शुभेच्छा मिळाल्याने अधिकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 1 =