ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज़

बॉम्बच्या अफवेने पुणे पोलीस लागले कामाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील वसंत टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. टॉकीजमध्ये बॉम्ब असल्याचे समजता पोलिसांचा फौजफाटा तात्काळ वसंत टॉकीजमध्ये पोहचला. सर्वत्र शोध घेतला असता बॉम्ब सदृश्य वस्तू कोठेही आढळून आली नाही. बॉम्ब नसल्याचे समजताच पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

रात्री पावणे नऊच्या सुमारास नियंत्रण कक्षाला नागरिकांनी फोन करुन वंसत टॉकीज येथे बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती दिली. नियंत्रणकक्षाला माहिती मिळताच नियंत्रण कक्षाने याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना दूर होण्यास सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला देण्यात आली.

पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने वसंत टॉकीज परिसरात असलेल्या बेवारस बॅग तपासली. त्यावेळी त्यामध्ये बॉम्ब नसल्याचे समजले. पोलिसांनी बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये कपडे सापडले. मात्र, या अफवेमुळे पुणे पोलीस कामाला लागले पुण्यातील भर वस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने पुणे पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बॉम्ब असल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या