शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांवर पुण्याची विशेष मोहोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रीडामंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. सन २०१७-१८ या वर्षांचे पुरस्कार देण्यात येणार असून खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात येणार आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये पुण्याने आपली विशेष छाप सोडली आहे.

या पुरस्कारांच्या निकषांमध्ये काही त्रुटी असल्याच्या तक्रारी क्रीडा विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे यावर विचारविनियम करून ३ वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे प्रदान करण्यात आले होते. यंदाही एकूण ८८ पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. या पुरस्करांमध्ये पुण्याने बाजी मारली असून पुण्याच्या वाट्याला या पुरस्करांपैकी एकूण १९ पुरस्कार आले आहेत. यात बुद्धिबळपटू, ॲथलीट्स, तिरंदाजी अशा विविध खेळ प्रकारातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

ह्यावेळेस पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे देण्यात येईल. तर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त खेळाडूंची नावे (पुणे)

सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार

गजानन मारुती पाटील, (ॲथलेटिक्स)
मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुध्दीबळ) (थेटपुरस्कार)जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ( उत्कृष्ठ मार्गदर्शक )
उमेश रमेशराव कुलकर्णी, (तायक्वोंदो) (थेट पुरस्कार)
बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो) (थेट पुरस्कार)
निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन), (थेट पुरस्कार)
दिपाली महेंद्र पाटील (सायकलिंग) जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ( उत्कृष्ठ मार्गदर्शक )

आर्चरी
भाग्यश्री नामदेव कोलते

वुशु
श्रावणी सोपान कटके

स्केटींग
सौरभ सुशिल भावे

जलतरण
श्वेजल शैलेश मानकर
युगा सुनिल बिरनाळे

बॅडमिंटन
नेहा पंडीत

कबड्डी
विकास बबन काळे, पुणे
सायली संजय केरीपाळे, पुणे

कुस्ती
उत्कर्ष पंढरीनाथ काळे

बुद्धिबळ
हर्षिद हरनीश राजा

लॉन टेनिस
ऋतुजा संपतराव भोसले

व्हॉलीबॉल
प्रियांका प्रेमचंद बोरा