देशभक्तीची ज्योत पेटवित पुणेकरांनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तान मुर्दाबाद….भारतमाता कि जय…अब की बार …करो ऐसा वार….पाकिस्तान के करो तुकडे चार…अशा घोषणा देत आणि देशभक्तीची ‘ज्योत’ पेटवित पुणेकरांनी शहिद जवानांना श्रध्दांजली वाहिली. विविध संस्थांच्या वतीने पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहिद जवानांना शनिवार वाडा प्रांगणात श्रध्दांजली वाहण्यासाठी सभा आयोजित केली होती.

यावेळी एस.के.जैन, निव्रूत्त कर्नल सुधीर सिन्हा, निव्रूत्तमेजर जनरल नितीन गडकरी, सुर्यकांत पाठक,डॉ .बाबा आढाव, भोलासिंग अरोरा, स्वाती गेलडा,बी.जे.देशमुख,अचल जैन,गणेश शिंदे, विजय भंडारी, अजित सेठीया, प्रवीण चोरबेले, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल,अशोक पगारिया आदी उपस्थित होते.

सी .आर .पी. एफ च्या जवानांना श्रध्दांजली वाहताना पुणेकरांनी लष्करावर जवानांवर आपला विश्वास असल्याचं दाखवुन दिले. त्याच प्रमाणे पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. देशभक्ती ने भारावलेल्या आणि शोकाकुल वातावरणात पुणेकरांनी मेणबत्तीची ज्योत पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय लष्करावर विश्वास ठेवावा असे आवाहन करीत या हल्ल्याचं उत्तर दिले जाईल असे नमूद केले. जवान हे सीमेवर भारतीय सीमेचे संरक्षण करीत असताना आपण नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन केले पाहिजे अशी अपेक्षा काही वक्त्यांनी व्यक्त केली. या हल्ल्याची घटनाच नाही तर भारतीय नागरिक सदैव तुमच्या पाठीशी आहेत असा विश्वास व्यक्त केला गेला. सी.आर.पी.एफचे काही जवान याप्रसंगी उपस्थित होते. जवानांच्या जीवनावर आधारित एक नाटीका सादर करीत त्यांच्या विषयी क्रुतज्ञता व्यक्त केली गेली. या सभेत शालेय विद्यार्थी ते जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.