क्राईम स्टोरीब्रेकिंग न्यूज़

सहायक निरीक्षकाने केला महिलेवर बलात्कार, मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाचे अमिष दाखवत महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय राजाराम मदने (३६, रा. फ्लॅट नं २०२, टॉवर नं. ३१, सेक्टर नं. २१, अमनोरा टाऊन पार्क, हडपसर, मुळ, गणेशवाडी, पो. खेड, ता. कर्जत जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकऱणी २८ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पिडीत महिलेने तिच्या पतीविरोधात तिचा छळ केल्याची तक्रार केली होती. त्यावेळी तिची ओळख मदने यांच्याशी झाली होती. काही दिवसांनंतर तिचा पतीसोबत घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यावर महिलेला आधार देण्याच्या बहाण्याने मदने यांनी जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने वारंवार लग्नाचा तगादा लावला. त्यावेळी तिला मारहाण केली. तसेच पोलीसात तक्रार देणार असल्याचे म्हटल्यावर तिला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button