सुनेसोबत लग्न करण्यासाठी वडिलांनी केला मुलाचा खून

फरिदकोट (पंजाब) : वृत्तसंस्था – सुनेसोबत अनैतिक संबंधाला अडथळा येत असलेल्या मुलाचा वडिलांनी धारदार हत्याराने सपासप वार करुन खून केला. आरोपी वडिलांना सुनेसोबत लग्न करायचे होते मात्र मुलचा अडथळा होत असल्याने त्याने हे कृत्य केले. पोलिसांनी केलेल्या तपासात हि माहिती समोर आली आहे. ही घटना पंजाबमधील फरिदकोट जिल्ह्यातील डाबरी खाना येथे घडली. याप्रकरणी ६२ वर्षीय वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

छोटा सिंह (वय-६२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. छोटा सिंह हा डाबरी खाना येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे मोठ्या मुलाच्या बायकोसोबत अनैतीक संबंध होते. या संबंधाला मोठा मुलगा अडथळा ठरत होता. त्यामुळेच त्याने हे कृत्य केले.
आरोपीने दोन महिन्यांपूर्वी फरिदकोट शहरात घर भाड्याने घेतले होते.

सुनेसोबत लग्न करुन या घरात राहण्याचा निर्णय त्याने घेतला होता. सासरा व सुनेमधील संबंधाची माहिती कुटुंबीयांना समजली. त्याच्या पत्नीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणाचेच ऐकत नव्हता. मंगळवारी रात्री त्याचा मोठा मुलगा घरामध्ये झोपला होता. हि संधी साधून त्याने मुलावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला. पुरवा नष्ट करण्यासाठी त्याने मुलाचे तुकडे केले आणि ते तुकडे मोठ्या पिशवीत भरून फेकण्यासाठी जात होता. त्याचवेळी लहान मुलाने त्याला पाहिले. पिशवीवर रक्ताचे डाग दिसल्याने मुलाने वडिलांकडे याची विचारणा केली. दरम्यान, वडिलांनी मुलाचा खून केल्याची माहिती कुटुंबाला समजली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला अटक केली.