क्राईम स्टोरी

तरुणीवर एकाचवेळी १० नराधमांनी केला लैंगिक अत्याचार

लुधियाना : पंजाब वृत्तसंस्था – पंजाब मधील लुधियाना येथे घृणास्पद घटना घडली आहे. आपल्या मित्रासोबत चारचाकी गाडीतून इसावल गावास जाण्यास निघालेल्या तरुणीवर १० नराधामांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणी हि २१ वर्षांची असून या घटनेने पंजाबमध्ये खळबळ माजली आहे.

पीडित तरुणी शनिवारी आपल्या मित्रासोबत चारचाकी गाडीतून लुधियानावरुन इसावाल येथे जात होती. या प्रवासा दरम्यान काहीजण दुचाकीवरून त्या गाडीचा पाठलाग करू लागले. पाठलाग करणाऱ्या लोकांनी जनराव या गावात त्यांची कार थांबवून चारचाकी गाडीवर दगडफेक केली. गाडीत बसलेल्या तरुणीला जबरदस्ती बाहेर काढून सिधवा येथे घेऊन गेले. त्या ठिकाणी आणखी काही लोकांना बोलवून त्या तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. असे पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून स्पष्ट झाले आहे.

पीडित तरुणीने या संबंधी तक्रार दिली आहे. १० ते ११ लोकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हणण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी कसून तपासणी करण्याचे धोरण अवलंबले असून या संदर्भात कोणालाही अद्याप अटक केली गेली नाही. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करणात आली असून त्या चाचणीत पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या