…अन् ‘या’ रेडिओ जॉकीमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्याचे प्राण !

वृत्तसंस्था – यूके मध्ये अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे सगळे हैराण झाले आहे. एका व्यक्तीने  रेडिओ स्टुडिओ मध्ये फोन करून मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आणि रेडिओ जॉकी ने क्षणाचा विलंब न करता समय सूचकता दाखवून या व्यक्तीचे प्राण वाचवले आहे. विशेष कौतुक या साठी होत आहे की या  रेडिओ जॉकीने स्टुडिओमध्ये बसून आत्महत्या करणाऱ्या  व्यक्तीचा जीव वाचवला आहे .
… म्हणून करत होता आत्महत्या 
या रेडिओ होस्टने ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ आत्महत्या करायला जात असलेल्या व्यक्तीला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवलं. क्रिस नावाच्या या व्यक्तीने रेडिओ स्टुडिओमध्ये फोन करुन सांगितले की, त्याने गोळ्यांचा ओवरडोस घेतला आहे आणि आता तो रस्त्यावर आत्महत्या करण्यासाठी जात आहे. क्रिसने रेडिओ होस्ट ली जवळ आपलं मन मोकळं करताना सांगितलं की, तो स्ट्रेस डिसऑर्डरने ग्रस्त आहे आणि आता त्याला जगायचच नाहीये.
असे वाचवले प्राण 
पण रेडिओ जॉकी ली ने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन क्रिसला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्याचं लोकेशन शोधून काढलं. प्रोग्राम प्रोड्युसरने लोकेशन ट्रेस करुन हेल्पलाइनला फोन करुन सूचना दिली. त्यांना सूचना देण्यात आल्यावर क्रिसला वाचवण्यात यश आलं. आता तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. हे कळाल्यावर रेडिओ जॉकीचे डोळे पाणावले. त्यानंतर ली ने याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. या संवेदनशील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.