राफेल करारावर राहुल गांधींनी केले फिल्मी विधान ; म्हणाले पिक्चर अभी बाकी है

छत्तीसगड : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारने चोरी केल्याची कबुली दिली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे असे कबूल केले आहे कि हवाई दलाशी संवाद न साधता मोदी सरकारने राफेर करारावर निर्णय घेतला आणि  ३० हजार कोटी रुपये मुकेश अंबानीच्या खिशात घातले असे म्हणत राहुल अगंधी यांनी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असे फिल्मी विधान केले आहे.

मोदी सरकारवर मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावा वेळी केलेल्या भाषणापासून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर राफेल घोटाळ्याचे आरोप लावले आहेत. अविश्वासाच्या ठरावाच्यावेळी त्यांनी राफेल घोटाळ्याचा पहिल्यांदा उल्लेख करून चोकीदार चोर है असे म्हणत मोदींवर जहरी टीका केली होती. नरेंद्र मोदींच्या स्वच्छ प्रतिमेवर घोटाळ्याचे आरोप लावण्याचे धाडस राहुल गांधी यांनी केले असून मुकेश अंबानींच्या भल्या साठी राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार  केला आहे असे राहुल गांधी नेहमी म्हणत असतात.

काल सरकारच्या वतीने राफेर करारा बाबतचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे त्यात मोदी सरकारच्या वतीने नमूद करण्यात आले आहे कि  ,राफेल कराची घोषणा हवाई दलाला पूर्व सूचना देण्याआगोदरच करण्यात आली  आहे. या आशयाचे वृत्त एका इंग्रजी वृत्त पोर्टलने केले असता राहुल गांधींनी आज त्या संदर्भात वक्तव्य करत पिक्चर अभी बाकी आहे असे म्हणले आहे. राहुल गांधींनी राफेल घोटाळ्यावर मोदी सरकाची चांगलीच कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे असे दिसते आहे. काल जामिनावर फिरणाऱ्या आई मुलांनी मला प्रामाणिकपणा शिकवू नये असे मोदी म्हणाले होते त्या पार्श्वभूमीवर  राहुल गांधींनी आज मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधीनी या अगोदर हि राफेल संदर्भात गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. डासू कंपनीने मुकेश अंबानींच्या कंपनीला २८२ कोटी दिले असून त्या पैशातून मुकेश अंबानींनी नागपुरात जमीन खरेदी केली आहे. तसेच मुकेश अंबानींच्या कंपणीची निवड व्हावी म्हणून मोदी सरकारने त्यांची शिफारस केली होती असे गंभीर आरोप राहुल गांधींनी केले आहेत. याच घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर  डासू कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक त्रपिएर यांची मुलाखत ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने आज घेतली आहे त्यात त्यांनी राहुल गांधींनी केलेले पूर्व आरोप फेटाळून लावले आहेत.