राजकीय

सीबीआय बडतर्फी वरून राज ठाकरेंची व्यंगचित्रातून मोदीवर टीका 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कृतीचे व्यंग आपल्या व्यंगचित्रातून साकारले आहे. अलोक वर्मा प्रकरण गाढता गाढता नरेंद्र मोदीच खड्ड्यात पडले आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. सरकारच्या दबावातून नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण हे सरकारच्या दबावातून रद्द केले आहे अशी टीका करत उद्या गायन वादनाच्या कार्यक्रमावर हि हे सरकार बंदी आणेल अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी एकाच चित्रात देशाच्या दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले असून मात्र दोन्हीचा आशय एकच आहे तो म्हणजे सरकार टाकत असलेला दबाव असे राज ठाकरे यांना  आपल्या व्यंगचित्रातून दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदी एका खड्ड्यात असल्याचे व्यंगचित्रात दाखवले आहे. एक सुजाण नागरिक खड्ड्यात उभ्या मोदींना आपण काय करताय असे विचारत आहे तर त्यावर मोदी म्हणत आहेत कि अलोक वर्मा प्रकरण गाढून टाकत आहे. त्यावर सुजाण  नागरिक मोदींना विचारत आहे अलोक वर्मा प्रकरण गाढत आहेत हे सर्व ठीक आहे परंतु आपण खड्ड्यात कसे त्यावर मोदी मात्र निरुत्तर झाल्याचे भाव चित्रातून स्पष्ट होत आहे.  तर अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या कृतीकडे वाकून बघत असल्याचे चित्रातून दिसते आहे.

तर ‘राग आणीबाणी’ नावाच्या शीर्षात गायनाचा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे यात पोलीस गाणे म्हणत असलेल्या कलाकारा सोमोर कागद पेन घेऊन उभा असल्याचे दिसते आहे. त्यात यापुढे गाण्याच्या कार्यक्रमावर हि सरकार बंदी घालेल असे दाखवण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी या अगोदर हि नरेंद्र मोदींवर व्यंगचित्रातून टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भर दिवाळीच्या सणामध्ये राज ठाकरे यांनी लक्ष केले होते. त्यांच्या व्यंगचित्रावर भाजपच्या वतीने हि व्यंगचित्रांतून उत्तर दिल्याचे प्रकार मागे घडले आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या